Writings

पीटर

सकाळी लौकरच म्हणजे ७ वाजता माझी बस होती, पेट्रा साठी. लौकरच आवरून मी ६.३० च्या दरम्यान बस (jett bus) थांब्या जवळ आलो. हा बस थांबा म्हणजे आपल्या कडेचे ST स्टॅन्ड न्हवे, जेथे खूप बसेस, मोठे आगार, लोकांची वर्दळ- लगबग, खाद्य विक्रेते, स्पीकर आवाज असले वैगेरे काहीही नाही. हा थांबा म्हणजे एक काचेचे AC ऑफिस आत खच्चून २५-३० लोकं, सर्व काही शांतपणे चाललेलं आणि बाजूलाच लागलेली एक सुपर लग्झरी बस,एकुलती एकच. इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अगदी अगदी नेमकेच. अम्मान सारख्या मोठ्या राजधानीच्या शहरांतून पेट्रा सारख्या अति महत्व असलेल्या सांस्कृतिक वारसा स्थळाला जाण्यासाठी फक्त दोनच बसेस. एक सकाळी ७ वाजता तर दुसरी संध्याकाळी ५.३० वाजता.

अला

जॉर्डन जायचे तर ठरले, पण विचार करत होतो कि एखादा जर रेफेरेंन्स मिळाला तर थोडी बहुत या यात्रेस दिशा मिळण्यास मदत होईल. तेंव्हा मला एकदम मार्को चे नाव आठवलं.

मल्हार

माझ्या पूर्ण जॉर्डन ट्रिप मध्ये मला पहिलाच आणि शेवटचा एकच, एकुलता भारतीय भेटला. तो पण तिथे कसा तर त्याच्या जॉबच्या, पॅशन च्या निमित्ताने…. आणि गम्मत म्हणजे पठ्ठया अस्सल मराठी, पुण्याचा. पहिल्या exciting गळा भेटीतच आमचा अस्सलिखित मराठी संवाद (संभाषण मुद्दाम जरा गावराणातच) 🙂

पेट्रा

कधीतरी कॉलेज मध्ये असताताना, अंदाजे ९२- ९३ चे साल असेल, तेंव्हा कोल्हापूर तील उमा थियेटर मध्ये पाहिलेल्या Indiana Jones and the last crusade (1989) मधील तो शेवटचा क्लायमॅक्स सिन कुठल्या तरी मेंदूच्या कोपऱ्यात, एक प्रचंड घर करून बसलेला.

मी मंगळावर तर नाही ना…

हो, हा प्रश्न मनामध्ये येणारच, असे हे दक्षिण जॉर्डन मधील युनेस्को संरक्षित वाळवंट क्षेत्र- वाडी रम. जवळपास ७२० स्के. कि.मी. परिसरात पसरलेलं हे एक ड्रॅमॅटिक डेझर्ट विल्डरनेस. वाडी रम, ज्याला चंद्राची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते, ही वाळूच्या दगडात आणि ग्रॅनाइट खडकात कापलेली दरी आहे, सौदी अरेबियाच्या सीमेजवळ आणि अकाबा शहराच्या पूर्वेस सुमारे 60 किमी. अंतरावर असलेली ही जॉर्डनमधील सर्वात मोठी वाडी (वाडी म्हणजे थोडक्यात वाळवंटातील शिळांच्या सानिध्यात असलेली दरी) आहे.

मृत समुद्र, जॉर्डन

आपल्या नेहमीच्या समुद्रा पेक्षा जवळपास 10 पट खारट पाणी असलेल्या या समुद्रात, आणि त्या मुळे प्रचंड घनता असलेल्या त्याच्या पाण्यात आपण बुडूच शकत नाही... पाणी एखाद्याला वरच ढकलत राहते. चालता चालता देखील पाय वरच खेचले जातात.. हा पण सांभाळून.. एखादा शिंतोडा जरी डोळ्यात गेला तर किंवा काही छोटी जरी जखम असेल तर.... बों....यला पाहिजे 😀.